Blog

Championing for clean, safe  well equipped toilets on Highways and long Roadways of Maharashtra 28 May

Championing for clean, safe well equipped toilets on Highways and long Roadways of Maharashtra

The deputed team of ‘Bharatiya Stree Shakti’ Maharashtra State Executive committee,  had a meeting with Minister of Revenue, Public works, Government of Maharashtra ‘Shri Chandrakant Dada Patil’ at his office in Mantralaya.

All the toilets on highways in Maharashtra  at every 100km will have proper arrangements for cleanliness management. His team was ready with the implementation systems and has decided to add our suggestions like including ‘search nearby toilets’ on Google maps. Providing sanitary napkin vending machines as well as incinerator in the toilet. 160 of them is already decided by them on Highway.

We had very fruitful discussion with Cabinet Minister of Transport, Government of Maharashtra Honourable ‘Shri. Diwakar Raote’.

Cleanliness of public toilets in the roadways and highways and the necessity of breast feeding area (“Hirkani Kaksha”) in restrooms at stops was discussed.

Enforcement of basic rules like making regular stops after 100km at toilets for private bus companies was discussed in detail. Honourable minister has given assurance to get the whole system in place along with a meeting with the Commissioner at the earliest.

Experiences of volunteers leads to questioning, which leads to discussions and solutions. This has been part of work culture in this organization. The latest is, making travel by road a safe and wonderful experience with clean and safe toilet facilities at every 100km on the highways and main roadways.

‘महाराष्ट्रातील सर्व महामार्गांवर दर १०० कि.मी. वर स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था असावी’ – हि भारतीय स्त्री शक्ती
शिष्टमंडळाची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मान्य.

भारतीय स्त्री शक्ती ही महिलांच्या समस्येवर काम करणारी संघटना आहे. प्रवासादरम्यान स्वच्छतागृहांच्या गैरसोयीमुळे
प्रवाशांना हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते. स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह असणे हा ग्राहक म्हणून प्रवाशांचा अधिकार आहे.
या संदर्भात दि. २८ मे २०१८ रोजी भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकर्त्यांनी मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील (सार्वजनिक बांधकाम
मंत्री) यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेमध्ये मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील १६० जागांवर अशा प्रकारची सुविधा निर्माण करू असे
आश्वासन दिले. स्वच्छतागृहांच्या देखरेखीसाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेदरम्यान भारतीय स्त्री शक्तीने केलेल्या
मागण्यांमध्ये गुगलमॅपवर सर्च नियरबाय मध्ये स्वच्छतागृहांचा पर्याय असावा व त्याच्या मूल्यांकनासाठी स्टार रेटिंगची सुविधा
असावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सॅनिटरी नॅपकिन्सचे वेंडिंग मशीन व विल्हेवाटीसाठी इनसेनरेटरची व्यवस्था प्रामुख्याने स्वच्छतागृहांमध्ये असावी. पाणी, भरपूर
प्रकाश, सुरक्षा, दिवे या व्यवस्था प्राधान्याने असाव्यात, तसेच महामार्गावर स्वच्छतागृहांकडे निर्देश फलक असावेत, इ. मागण्या
यावेळी करण्यात आल्या.

या चर्चेदरम्यान केलेल्या मागण्यावर कृती आराखडा तयार करुन लवकरात लवकर अमलात आणण्याचे आश्वासन मा. मंत्री
महोदयांनी दिले.

याच बरोबर राज्य परिवहन मंत्री मा. दिवाकररावजी रावते यांचीही भेट स्त्री शक्तीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. राज्य परिवहन
महामंडळाच्या स्वच्छता गृहांमधील स्वच्छतेबाबत चर्चा केली. तसेच प्रत्येक स्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ असावेत, हि मागणी
केली. खाजगी बस व्यावसायिकांनी स्वच्छतागृहांची सोय करावी. तसेच प्रत्येक १०० कि.मी. नंतर स्वच्छतागृहांजवळ बस थांबविणे
त्यांना बंधनकारक असावे, अशी मागणी स्त्री शक्तिने केली. मा. मंत्री महोदयांनी सर्व मागण्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार
करण्याचे व परिवहन आयुक्तांसोबत लवकरात लवकर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष सीमा देशपांडे, राष्ट्रीय सह सचिव वर्ष पवार-तावडे, प्रा. सुरेखा किनगावकर, नांदेड, प्रा. अर्चना
बक्षी, चिपळूण, अॅड. प्रतिमा शेलार, मंजुळा नायर, राजश्री नागरे, मनीषा चव्हाण, नूतन वरेरकर, साबिरा शेख, शकुंतला राव या
कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.